माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर…. — डॉ.अमोल बेनके आणि राहुल आल्हाट युवा गौरव पुरस्कार जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

चाकण : येथील लक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून कै.शांताराम महादू भुजबळ यांच्या २२व्या स्मृतीदिनानिमित्त जीवन गौरव व युवा गौरव पुरस्कार जाहीर झाले असून यात प्रामुख्याने शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे तसेच डॉ.अमोल बेनके आणि राहुल आल्हाट युवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे लक्ष्मी ग्रुपचे प्रमुख अशोक भुजबळ यांनी सांगितले आहे.

         यावेळी जीवन विद्या मिशनचे व्याख्याते हभप भरत महाराज पांगारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण गुरुवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११वा. होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे उपस्थित राहणार आहेत. तसेच कै.शांताराम महादू भुजबळ स्मृती ग्रंथालयाचे नुतनीकरण केलेल्या वास्तुचे लोकार्पण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच रोटरी क्लब, रोटरी एअरपोर्ट, लायन्स क्लब व सफायर आणि चाकण पतसंस्थेच्या अध्यक्षांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे भुजबळ यांनी सांगितले.