असदपूर ग्रामपंचायतने केला समाजसेवक प्रमोद नितनवरे  यांचा सत्कार..

 

युवराज डोंगरे/खल्लार

वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांच्या स्वच्छतारूपी महान संदेशाने प्रेरित होऊन ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गावात स्वच्छता मोहीम राबवून गावाला स्वच्छ ठेवण्याचे आदर्शदायी कार्य करणारे असदपुर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा समाजसेवक प्रमोद हरिश्चंद्र नितनवरे यांचा नुकताच असदपुर ग्रा पं द्वारा सत्कार करण्यात आला.

अचलपूर तालुक्यात लोकसंख्येने मोठे असलेल्या 

असदपुर या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता मोहीम राबवून गावातील असलेला घनकचरा साफ करून गाव स्वच्छ ठेवण्याचा व त्याचबरोबर आपल्या या समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांना देखील गावात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने प्रेरित करण्याचा प्रयत्न प्रमोद नितनवरे हे करीत आहे.

त्यांच्या या आदर्शमय उपक्रमाची दखल घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या ऐतिहासिक पर्वावर गावातील छत्रपती चौक येथे असदपूर ग्रामपंचायतचे सरपंच मोहन हरिश्चंद्रजी मुंदाने यांच्या हस्ते प्रमोद हरिचंद्र नितनवरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

        या सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तथा गावातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.