आरमोरी तालुका पञकारांची व्हाईस‌ ऑफ मिडीया संघटनेची कार्यकारिणी घोषित.

 

ऋषी सहारे

संपादक

       आरमोरी तालुक्यातील पञकारांची स्थानिक वन विभागाच्या शासकिय विश्राम गृहात दि.२३ मे २०२३ ला सकाळी ९ वा. व्हाईस आॅफ मिडीया चे जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दूडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येवून खालील कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

       अध्यक्ष – सुनिल नंदनवार , उपाध्यक्ष – देवानंद जांभुळकर, उपाध्यक्ष – सुरेंद्र बावणकर‌‌, कार्याध्यक्ष-चुन्नीलाल मोटघरे, सरचिटणीस -सुरेश कांबळे, सहसरचिटणीस – शैलेश गजभिये, खजिनदार/ कोषाध्यक्ष -रोहिदास बोदेले, कार्यवाहक-भिमराव ढवळे,संघटक-ऋषी सहारे, प्रसिध्दी प्रमुख – चंद्रशेखर किरमे, सदस्य- टीकेश मोंगरकार इत्यादीची पदाधिकारी म्हणून कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

      देशभरात पञकारांसाठी अनेक संघटना कार्यरत आहेत.त्यापैकी व्हाईस आॅफ मिडीया संघटनेने पञकारांच्या कल्याणासाठी पञकारांचा जिवन विमा‌‌ , निवासासाठी घरे, सेवानिवृत्ती योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, नवे तंत्रज्ञान शिकवणी या सारख्या पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले आहे.

           व्हाईस आॅफ मिडीया या पञकार संघटनेची देशभरातील व्याप्ती आणि संघटनेनी मांडलेल्या पंचसूत्री कार्यक्रम हे पञकारांसाठी कल्याणकारी असुन पञकारांनी संघटनेत सहभागी होवून सदस्य व्हावे, असे आवाहन या कार्यकरीणी च्या वतीने करण्यात आले आहे.