शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी,सहकारी तांदुळ गिरणी चिमूरचे माजी अध्यक्ष सोपान खोडके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चिमूर बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू पाटील गावंडे,शंकरपूर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊराव बावनकर यांनी भाजपात प्रवेश केला.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या उपस्थितीत चिमूर येथील माजी खनिकर्म महामंडळ अध्यक्ष तथा माजी आमदार डाँ.अविनाश वारजूकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला.
शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच हे विविध पदांवर विराजमान आहेत.सहकारी तांदुळ गिरणी चिमूरचे माजी अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चिमूर बाजार समितीचे माजी उपसभापती,शंकरपूर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असून सहकार क्षेत्रात त्यांचे वर्चस्व आहे.त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसला परत खिंडार पडली आहे.
पक्षप्रवेश सोहळ्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया,बाजार समिती महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचे संचालक घनश्याम डुकरे,भिसी नगर पंचायती चे बांधकाम सभापती हर्षल डुकरे,भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



