बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय , ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य कार्यालय, तलाठी कार्यालय, आधी सर्व ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके यांच्या हस्ते तर विद्यालयाच्या समोर मुख्याध्यापक भरत कोरटकर (सर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुतळ्याचे पूजन आशोक बोडके यांच्या हस्ते झाले, ध्वजा पूजन सतीश सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी संस्थापक अध्यक्षा सुभद्राबाई बोडके ,संचालक श्रीकांत बोडके, सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, रामचंद्र लावंड, प्रभाकर बोडके, चांगदेव बोडके, आशोक बोडके, समाधान बोडके, दादाभाई शेख, राहुल शिंदे, डॉक्टर सुमित्रा कोकाटे, पाटील मॅडम सह आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरसिंहपुर ग्रामपंचायत कार्यालया समोर विद्यमान सरपंच अर्चना सरवदे, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. १९५० साली याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्या ऐतिहासिक घटनेसाठी दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
नरसिंहपुर, टणु , गिरवी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, लुमेवाडी, गणेशवाडी, सराटी, गोंदी, लिंबोडी चव्हाण वस्ती, आडोबा वस्ती, सुतार वस्ती, आधी सर्व भागातील शाळा व ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, आरोग्य कार्यालय, नरसिंहपूर पोलीस स्टेशन, या सर्व ठिकाणी शासन आदेशानुसार ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रत्येक गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, आजी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, अध्यक्ष,विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वर्ग गावातील तरुण कार्यकर्ते, सर्व ग्रामसेवक अधिकारी ,व महिला भगिनी, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी, समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक शासकीय कार्यालया समोरही ध्वजारोहण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळा,महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी कवायत व भाषणे, देशभक्तीपर गीते सादर करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.
प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संविधानातील मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांची आठवण करून देणारा दिवस आहे, असे मत यावेळी पिंपरी बुद्रुक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर यांनी व्यक्त केले.



