Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे यांच्या प्रचाराला...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे यांच्या प्रचाराला वेग…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुऱ्हाडे यांच्या प्रचार मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागनिहाय घेतल्या जाणाऱ्या पदयात्रा, घर-घर संपर्क आणि संवाद सभांमुळे त्यांच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे.

        शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि यात्रेकरू सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर कुऱ्हाडे नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचा आपला दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला असून, “विकास आणि पारदर्शक प्रशासन” हा आपला मुख्य मंत्र असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

         प्रचार दौऱ्यादरम्यान महिलावर्ग, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय ठरत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न मांडले. याचबरोबर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची सक्रियता आणि कार्यकर्त्यांची जोरदार उपस्थितीमुळे वातावरण आणखी रंगतदार झाले आहे.

         नगरपरिषद निवडणुकीत प्रकाश कुऱ्हाडे हे मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असून, त्यांच्या प्रचाराला मिळणारा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद निवडणुकीची लढत आणखी चुरशीची करणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.