Home Social भारतीय संविधान एक अनमोल ठेवा,आमदार रवि राणा…

भारतीय संविधान एक अनमोल ठेवा,आमदार रवि राणा…

 युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक 

          मूलभूत हक्कांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आणि राष्ट्राला मजबूत बनवणारे भारतीय संविधान, हा समस्त भारतीयांचा मौल्यवान दस्तावेज व एक अनमोल असा ठेवा आहे आणि म्हणूनच त्याचे प्राणपणाने जतन करणे ही आपली सर्वांची मूलभूत जबाबदारी आहे.असे प्रतिपादन बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा यांनी केले. 

         साईनगर परिसरातील नालंदा बुद्ध विहाराच्या “संविधान सन्मान समारंभाच्या” अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अमरावतीचे उपजिल्हाधिकारी अनिल भटकर व सामाजिक कार्यकर्ते सचिन भेंडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते. 

          पाहुण्यांच्या हस्ते, तथागत सम्यक संबुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाईंच्या प्रतिमांच्या अभिवादनाने संविधान सन्मान सभेचा प्रारंभ करण्यात आला. नालंदा बुद्ध विहार व साईनगर बुद्ध विहार कृती समितीच्या वतीने आमदार रवि राणा तसेच उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आला.

         याप्रसंगी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत अठरा पगड जातीचे योगदान” या दर्जेदार पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ. प्रविण राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

        नालंदा बुद्ध विहारासमोरील अशोकवाटिकेत, सभामंडपाच्या उभारणी करिता, आमदार रवि राणा यांनी आपल्या आमदार निधीतून 25 लक्ष रुपये मंजूर केलेत. संविधान दिनाच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून सदर सभामंडपाच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ आमदार रवि राणा व उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

         भारताचे संविधान हे सर्वसामान्यांच्या उत्कर्षाचा जाहीरनामा असल्याने ते घराघरात पोहचणे अगत्याचे असल्याचे” प्रतिपादन अनिल भटकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय अध्ययन मंचाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

          याप्रसंगी, भारतीय संविधानाची महती विशद करणारी, मान्यवरांची समयोचित भाषणे संपन्न झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र चवरे यांनी, सूत्रसंचालन सूरज मंडे यांनी तर आभारप्रदर्शन पद्माकर मांडवधरे यांनी केले. 

       कार्यक्रमाला देवा शेंडे, शैलेश कस्तुरे, विनायक दुधे, साहेबराव नाईक, विलास मोहाडे, रविंद्र गेडाम, भगवान इंगळे, प्रितम रामटेके, चंद्रमणी गणवीर, सुनिल तायडे, उदय पर्वतकर, अमोल इंगळे, चंदू रामटेके, नाना गवई, वसंतराव देशमुख, छत्रपती पवार, संजय रामटेके, नरेंद्र टेंभूरने, भाउराव सरकटे, सुदेश वासनकर, अनिकेत पाटील, पुरुषोत्तम भटकर, प्रल्हाद इंगोले, भीमराव दंदे, रामचंद्र खंडारे, सुनिल शेंडे, सतीश नाईक, डॉ. बेले, मंगेश डोंगरे, अवधूत शेंडे, सत्यवान लांजेवर, निलेश दांडगे, विजय नंदेश्वर, निलेश मेश्राम, जानराव वाघमारे, आशिष आठवले, गौतम गजभिये, मनोहर दंदे, वामनराव रामटेके, मनोज पारवे, अरुण बडगे, प्रकाश खंडारे, अजय राऊत, प्रशांत कावरे, अमोल डोंगरे, सहदेव गजभिये, प्रमोद मेश्राम, ताराचंद शेंडे, सागर खंडारे तसेच मातोश्री रमाई महिला मंडळाच्या मंदा मेश्राम, विद्या खंडारे, वंदना चवरे, महानंदा वासनिक, जयमाला रामटेके, साधना इंगळे, इंदिरा दुधे, सुनीता रामटेके, संगीता मंडे, शुभांगी मोहोड, कुंजलता गेडाम, सिमा मांडवधरे, शिला तायडे, आरती शेंडे, सुनंदा भोवते, शिल्पा राऊत, अनिता गवई, रेखा टेंभुरणे, मीरा माकोडे, रमा दंदे, वैशाली क्षीरसागर, आशा मेश्राम, सुजाता बडगे, अंजली अडकणे, प्रेमलता वाघमारे, वैशाली मेश्राम, निता चव्हाण, रश्मी डोंगरे यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.