ढगाळलेल वातावरण,थंडीने गारठले,पाऊस झाला-होणार,शेतकरी गंभीर चिंताग्रस्त…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका

          दोन दिवसांपासून ढगाळलेल वातावरण आहे.आज तर सकाळपासूनच थंडगार गारव्याने गारठले आहे.यामुळे अनेक नागरिकांना अस्सल हिवाळ्याची जाणिव झाली व पुर्णतः ढगाळलेल्या वातावरणामुळे पाऊस होणार अशी लोक चर्चा सुध्दा ऐकू आली.बऱ्याच नागरिकांनी थंडगार गारव्यामुळे घराबाहेर पडण्यापेक्षा आज घरी राहायला पसंती दिली.

          हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्र,कोकण किनारपट्टी,मराठवाडा व विदर्भात पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली होती.मात्र,काल आणि आज सकाळच्या वेळेत राज्याच्या काही जिल्ह्यांत तुरळक व मध्यम प्रमाणात पाऊस झाला तर विदर्भातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याची चिन्हे आहेत.

           विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने विदर्भातील भात(धान) व कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

            धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांचा धान कापलेला असून पाऊस पडल्यास धान खराब होणार व धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता आहे यामुळे जड धान उत्पादक शेतकरी गंभीर चिंताग्रस्त झाले आहेत.याचबरोबर लागलेला खर्च काढायचा कुढूण? व घेतलेले खाजगी व सोसायटी,बँक चे कर्ज पेढ करायचे कसे? याबाबत त्यांना चिंता सतावू लागली आहे.

          तद्वतच कापूस पिकांवर पाऊस पडल्यास कापूस काळा होईल व उभ्या कपास पिकांचे बोंड गळून पडतील याची भिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झाली आहे.यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मनोबल खचले असून पुढे जगायचे कसे व कर्ज फेडण्यासाठी काय करावे?या विवंचनेत पडले आहेत.

           याचबरोबर तुळ उत्पादक शेतकऱ्यांना ढगाळलेल्या वातावरणाचा जोरदार फटका बसणार असून तूळ पिकांचे फुलबार गळून पडणार आहे.

          एकंदरीत अवकाळी पाऊस सर्व प्रकारच्या पिक उत्पादन शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करणार हे निश्चित झाले आहे.

         हवामान खात्याच्या अंदाजानुसार २ डिसेंबर पर्यंत पाऊस लांबणार असल्याने परत ४ दिवस काही ठिकाणी थंडगार वातावरणात असणार आहे व पाऊस पडणार आहे.

             ढगाळलेल्या वातावरणातंर्गत गारव्याने गारठले असल्याने थंडीची हुडहुडी जाणवू लागली आहे.