डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या संकल्पासाठी सर्वस्व अर्पण करु : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे… — आळंदीत डॉ.गावडे महाराज यांचा जीवन समर्पन संकल्प सोहळा संपन्न… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल. लवकरात लवकर मंदिर उभारण्याचा संकल्पासाठी तसेच डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या जीवन समर्पन संकल्पासाठी आम्ही सर्वस्व अर्पण करु असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

         आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हभप डॉ.पंकज महाराज गावडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा, भव्य किर्तन, मातृपुजन, संतपुजन व जीवन समर्पन संकल्प सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या यावेळी ते बोलत होते.

          याप्रसंगी डॉ.नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, माजी आमदार विलासराव लांडे, सुर्यकांत पलांडे, बापूसाहेब पठारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप, मंगलदास बांदल, शरद बुट्टे पाटील, डॉ.राम गावडे, पुरुषोत्तम महाराज मोरे, ॲड.राजेंद्र उमाप, सुरेश वडगावकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रिया पवार, शंकर जगताप, प्रकाश काळे, अजित वडगावकर, सुधीर मुंगसे, निलेश बोरचटे, श्रीकांत महाराज दुराफे आदी मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी पंकज महाराज गावडे यांनी जीवन समर्पन संकल्पनेतून महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय प्रसारासाठी २००० वारकरी केंद्र उभारण्यात येणार आहे, तसेच किर्तन व प्रवचन सेवेतून जे मानधन मिळेल ते संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी वापरण्यात येईल, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेतील ५० विद्यार्थ्यांना अन्नदान (मधूकरी) सेवा मी जीवंत असेपर्यंत करणार आहे असे अनेक विविध समाजोपयोगी संकल्प त्यांनी मांडले आहेत हे सर्व पुर्ण करण्यासाठी आपणा सर्वांचे आशिर्वाद व सहकार्य असणे आवश्यक आहे असे डॉ.गावडे महाराज यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार विलासराव लांडे व सुत्रसंचलन श्रीकांत महाराज दुराफे यांनी केले.