कळंब – वालचंदनगर परिसरात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा… — आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          भारतीय संविधान दिना निमित्त कळंब – वालचंदनगर तालुका इंदापूर या परिसरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनाचे औचित्य साधून कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाचनालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.तसेच 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह सुहास डोंबाळे,रामचंद्र कदम,सरपंच विद्या अतुल सावंत,राजेंद्र डोंबाळे, योगेश डोंबाळे,संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

        याप्रसंगी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की महामानव भारतरत्न डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांनी अविरत परिश्रम घेऊन आपल्या देशाला संविधान दिले असून खऱ्या अर्थाने संविधानामुळेच आपल्याला समानतेचे हक्क-अधिकार आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.त्यामुळे आजचा संविधान दिन म्हणजे हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अखंड देशवासीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असल्याचे आ.भरणे म्हणाले.

       तसेच वालचंदनगर येथे सुध्दा भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट (एनजीओ)च्या वतीने संविधान सन्मान दौड चे आयोजन  आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

          या प्रसंगी वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता तळेकर ,विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य अहिरे सर,वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य निकम सर,उबाळे सर,अहिवळे सर,वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड,उपसरपंच रोहित झेंडे,वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सर्वंगोड सर,भारत चिल्ड्रन्स ॲकडमी चे प्राचार्य क्षिरसागर सर, व्होकेशनल एज्युकेशन लासुर्णे चे सोनवणे सर,भोसले सर,चव्हाण सर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद झेंडे, माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड,वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य पांढरे,राष्ट्रवादीचे गणेश धांडोरे,आकाश पवार,रवि जाधव, वर्धमान विद्यालयाचे भोरे सर, ज्योत्स्ना गायकवाड मॅडम,कळंबच्या पोलीस पाटील सौ.करडे,पाखरे सर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय विनोद पवार व अनेक शाळांचे शिक्षक उपस्थित होते. 

               प्रचंड उत्साहात झालेली ही स्पर्धा चार गटांत झाली.17 वर्षांवरील मुलींच्या गटात 1)२)३) यांनी क्रमांक पटकावले तसेच १७ वर्षांखालील गटात १)२)३)या मुलींनी क्रमांक पटकावले.

         त्याचप्रमाणे १७ वर्षांवरील मुलांच्या गटात १)२)३) यांनी तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात १)२)३) यांनी क्रमांक पटकावले.

            उत्कृष्ट नियोजन, वालचंदनगर पोलीस स्टेशन चा चोख बंदोबस्त, प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे यांची तप्तर सेवा या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत सुरवातीला संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन API साळुंखे साहेब यांच्या हस्ते पुजन करून सुरवात झाली.मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तकिचे पुजन व दिपप्रज्वलन केले. नंतर राष्ट्रीय गीत गाऊन साळुंखे साहेबांनी उद्देशिका वाचन करून सगळ्यांना ग्रहीत केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी प्रास्ताविक केले तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ नम्रता तळेकर, साळुंखे सर, सरपंच गायकवाड यांनी सर्वांना प्रबोधित केले. 

         एकुण ९ विद्यालय, महाविद्यालय यांमधील २०० धावपटुंनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, स्वयंसेवक, कर्मचारी, सचिव यांनी मेहनत घेतली.