सातरगाव येथे अमृत कलश रॅली जल्लोषात साजरी.

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक

नुकतेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे सांगता समारोप म्हणून अमृत कलश रॅलीचे आयोजन जि. प. पुर्व माध्य. शाळा, व ग्रामपंचायत कार्यालय सातरगाव यांचे संयुक्त विद्यमाने करण्या आले होते. 

      सर्वप्रथम अमृत कलश रॅलीचे ह.भ.प.संतश्री गिरी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन व माती अर्पणन करून रीतसर उद्घाटन करण्यात आले. माजरी म्हसला केंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्रधान मंत्री शालेय शक्ती पोषण निर्माण योजनेच्या अधिक्षक कल्पनाताई वानखेडे यांनी रॅलीला तिरंगा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.

              रॅली आयोजनमुळे सर्व गावामधे उत्साह संचारला असल्याचे पाहवयास मिळाले. गावकऱ्यांनी रॅली मार्गांवर सडा टाकून, रांगोळी काढुन व पुष्प सजावट करून रॅलीचे दारोदार स्वागत केले. युवकवर्गानी तर फटाक्याची आतिषबाजी करून कलश रॅली चे स्वागत केले. गावातील प्रत्येक घरातून कलश पूजन करून शेतातून आणलेली माती व तांदूळ कलशात अर्पण केली. रॅलीत डी.जे. ढोल, डफडी, टाळ, मृदंग, विणा यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. 

      या रॅलीत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, गावातील वारकरी भजनी मंडळ, पखवाद भजन मंडळ, डफळी वादक, पोवाडा गायन, महिला मंडळ युवावर्ग अबाल ते वयोवृद्ध सर्वांनी सहभाग दर्शवून वाजत-गाजत, नाचत अमृत कलश रॅली यशस्वी केली.

       या अमृत कलश रॅलीचे समारोप सरपंचा मोनिकाताई काकडे, उपसरपंच अभिषेक भोयर,आणि इतर मान्यवर यांचे उपस्थिती पंचप्राण शपथ घेऊन शाळेच्या प्रांगणात झाला.

               अमृत कलश रॅली यशस्वी करण्याकरिता सुरज काकडे, अनिकेत मेश्राम, मयुर लोमटे, शिल्पाताई गावंडे, उषाताई वरकड, निता उके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भोलानंद बोबडे, उपाध्यक्षा सपनाताई चवरे, सदस्य राजेश डोनारकर, शेख नसीर शेख सिकंदर, विजय गजभिये, रेखाताई मारस्कोल्हे, पल्लवीताई वाकोडे, कल्पनाताई पोपळघाटे, स्वातीताई अंबुलकर, रिनाताई, सविताताई मेश्राम, म. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजानन वैश्य, मुख्याध्यापक संजय नेवारे, शिक्षक राजेंद्र काळे, उमेश ठाकरे, विजय चव्हाण अंगणवाडी सेविका मंदाताई काकडे, आशा वर्कर मीनाताई भगत भोलानंद बोबडे, राजेश डोनारकर, प्रतीक गजभिये व युवावर्गानी मेहनत घेतली. यामधे अंगणवाडी, आरोग्य विभाग, पंचायत विभाग आणि सर्व स्तरातील गावकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ऐकतेचे परिचय करून दिला.