छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथक व सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे उदघाट्न संपन्न.

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

        छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे उद्घाटन व सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे उदघाटन संपन्न झाले.

            या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते डॉ. भारत कल्याणकर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती देऊन त्यांना नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर तसेच विद्यापीठांतर्गत व राज्यस्तरावरचे शिबिरे यांची संपूर्ण माहिती देण्यात आली.

                   तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी सांगून राष्ट्राच्या विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही चळवळ किती महत्त्वाची आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे उपस्थित होते. डॉ. रविंद्र इचे डॉ. प्रविण सदार या कार्यक्रमाची संपूर्ण मार्गदर्शक व कार्यक्रमाधिकारी डॉ आशिष काळे यांनी उत्कृष्ट असे कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रथमता राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवकनी संपूर्ण महाविद्यालय परिसर हा स्वच्छ करण्यात आला .

                   त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळ समिती तसेच राष्ट्रीय सेवा योजना समिती यावेळी स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. आशिष काळे व प्रास्ताविक डॉ. प्रविण सदार तसेच आभार प्रदर्शन डॉ रविंद्र इचे यांनी केले.