किराणा दुकानातून रोख रक्कम चोरणार्‍या दोघास अटक… — आरमोरी पोलिसाची दबंग कारवाई…..

 

प्रितम जनबंधु

   संपादक

 

            आरमोरी येथील प्रमोद नकटू दवडे यांच्या किराणा दुकानातून रोख रक्कम चोरणार्‍या दोन आरोपीस आरमोरी पोलिसांनी अटक केली असून एकाची रवानगी चंद्रपूर कारागृहात करण्यात आली आहे तर दुसर्‍या आरोपीस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

                रोशन पवनसिंग ठाकूर (36) व किशोर ऊर्फ टमटम पंजाबराव जुमडे (35) दोघेही रा. गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.

                  सदर दोन्ही आरोपींवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी, अवैध दारू विक्री यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.

            २५ ऑगस्ट २०२३ च्या रात्री १ वाजताच्या सुमारास या आरोपींनी प्रमोद दवडे यांच्या दुकानातून २ हजार रुपयांची चोरी केली होती. याबाबत आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच ३० दिवसांच्या आत त्यांना जेरबंद करण्यात आरमोरी पोलीसाना यश आले आहे.

           रोशन यास जिल्हा कारागृह चंद्रपूर येथून प्रोडक्शन वॉरंटद्वारे अटक करण्यात आली व त्याची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली तर किशोर यास गडचिरोली येथून अटक करण्यात आली व त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार विशाल केदार करीत आहेत.