संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथील १००% एस एस सी बोर्ड निकालाची परंपरा कायम…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

            आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा यांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवीत संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथील दाहावी वर्गाचा निकाल १००% टक्के लागलेला असून संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने १००% निकालाची परंपरा मागील ४ वर्षांपासून कायम राखली आहे.

         संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथील विद्यार्थी काव्य जागेश्वर सोरते याने 89.40 % प्राप्त करीत शाळेमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. श्रुती विजय गजभिये हिने 88.20 % प्राप्त करीत शाळेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रिनल बाळकृष्ण बोरकर हिने 86.40 % गुण मिळविले असून शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

             तसेच आयुष चौधरी 86.20% , सम्यक सहारे 86.00 % , विधी बंसोड 83.60% , अंश मेश्राम 82.00% , अल्फोंसा नैताम 82.00% , प्रांजल काचीनवार 80.00% , गुंजन राऊत 79.80% , सिद्धार्थ शेंडे 78.40% , विष्णू उईके 76.80% विद्यार्थी 75.00 % पेक्षा जास्त टक्के प्राप्त करून शाळेचा नाव लौकिक केला.

          यावेळी आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शाळेचे प्राचार्य व शिक्षकाचे उत्कृष्ट मार्गदर्शन, शाळेत होणारे नियमित वर्ग, नियमित चाचण्या शाळेत मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, शाळेतील मोफत वायफाय, यामुळेच हे यश प्राप्त करता आले असे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

          या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये, बी. के.दाऊदसरिया सर, आर. जे. पवार मॅडम, एम.जी. वाईकर मॅडम, एम. आर. ठाकूर मॅडम, एन. के. निरंकारी मॅडम, एच. एम. मुसानी मॅडम, यांना दिलेले आहे.

          या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मोहनजी अरमरकर संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, उपाध्यक्ष गजानन येलतुरे संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये, संस्था सदस्य इंजि.गुणवंत फाये,शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये, विमलताई फाये, वर्षाताई फाये व शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये, व,संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारणी मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केलेले आहे.