शिवाजी हायस्कूल कुरखेडा ची सायली गाडेगोने तालुक्यातून व्दितीय…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

           श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल कुरखेडा चा इयत्ता १० वी चा निकाल ९३.३८% लागला असून , २७ विद्यार्थी प्रविण्याप्राप्त श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. 

          कु.सायली सितकुरा गाडेगोने हि ९३.४० % गुण घेऊन कुरखेडा तालुक्यातून व्दितीय तसेच शिवाजी हायस्कूल कुरखेडा या शाळेतून प्रथम आलेली आहे तर कु.श्रद्धा किसान अंबादे हि ९१.२०% गुण घेऊन विद्यालयातून व्दितीय आलेली आहे व कु.मयुरी यादव बाळबुद्धे हि ८७.६०% गुण घेऊन विद्यालायामधून तृतीय आली , कु.मंतशा सिराज पठाण हि ८६.६०% गुण घेऊन विद्यालायामधून चौथी आलेली आहे , कु.उर्वशी शुद्धोधन सहारे व होमराज राजकुमार ढोरे यांनी संयुक्तपने ८५.४०% गुण घेऊन विद्यालायामधून पाचव्या क्रमांकावर आलेले आहेत. 

           तसेच विद्यालायामधून कु.टिनूताई शरद पवार हिला ८४.२०% गुण , कु.भूमिका सुरेश देशमुख ८४.२०% गुण कु.वेदिका प्रमोद राखडे ८४.००% गुण , कु.नंदिनी सुनील डोंगरवार ८२.८०% गुण , कु.तन्वी रेवनाथ लांजेवार हि ८१.००% गुण प्राप्त केले.                               

         या निकालाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीस सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन उच्च शिक्षणाची कास धरावी , आपला व आपल्या कुटुंबाचा व शिवाजी हायस्कूल कुरखेडा चे नाव लौकिक करावा असे मत व्यक्त केले व गुणवंत विद्यार्थी व पालकांचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. 

        यावेळी सत्कार समारंभाला कुरखेडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठाण तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक सितकुरा गाडेगोने , किसन अंबादे , यादव बाळबुद्धे, शुद्दोधन सहारे हे उपस्थित होते. 

       शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ श, गडचिरोली चे अध्यक्ष श्री.अनिल पाटील म्हशाखेत्री, संस्थेचे सचिव श्री.गोविंदराव बानबले व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे शाळा समिती अध्यक्ष अरुण पाटील मूनघाटे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. 

         गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार व विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर कोल्हे , उद्धव वाघाडे , चंद्रकांत नरुले , नोगेश गेडाम , लीकेश कोडापे , महेंद्र नवघडे , निखील कसबे , कालिदास सोरते , स्वप्नील खेवले , रुपेश भोयर विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक अनिल बांबोळे , कनिष्ठ लिपिक लोकेश राऊत , शिवा भोयर , घनश्याम भोयर व सर्व शिक्षकांना दिले आहे.