आरमोरी तालुक्यात शासकीय आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ… — आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले उदघाटन…

 

ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी –

      महाराष्ट्र स्टेट को-आॕपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.शासकीय आधारभूत किंमत उन्हाळी धान खरेदी योजना सन २०२२-२३ अंतर्गत आरमोरी येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था तर्फे भात खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्राचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आज दि.२६ मे २०२३ रोजी करण्यात आले. सायगाव येथील शेतकरी नानाजी प्रधान यांचे धान खरेदी करून उन्हाळी धान केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

     यावेळी उद्घाटन सोहळ्याला आ.कृष्णा गजबे यांच्यासोबत आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, भाजपा तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, भा. ज. यु.मो. चे आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, आरमोरी सहकारी खरेदी विक्री संस्थेचे सभापती मनोज मने, उपसभापती दीपक निंबेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमिश निमजे,सहसचिव राहुल तीतीरमारे,अक्षय हेमके,गोविंदा भोयर, होमराज जुवारे, अनंत सरसडे, अमोल ठवकर,खरेदी विक्री संस्थेचे संचालक संजय हेमके,पांडुरंग दोनाडकर , जागोबा खेडकर, रेवती मने ,खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापक अक्षय् माकडे, कर्मचारी सचिन फाये,कार्तिक खेडकर, सुरेश कांबळे तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. 

 शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे तसेच आरमोरी सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे. संबंधीत केंद्रावर नियमित धान खरेदी करणे सुरू झाले आहे.