राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष,माजीमंत्री तथा आमदार डॉ.राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा आरमोरी विधानसभा क्षेत्राचा दौरा कार्यक्रम आयोजित केला असून ते दिनांक ३१ मार्च पासून दौरा आरंभ करणार आहेत.
मंगळवार – 31/03/2026,ला सकाळी 11.00 वा.,राजवाडा निवासस्थान,अहेरी येथून गडचिरोलीकडे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रयाण होणार आहे,दुपारी 04.00 वा.गडचिरोली येथे त्यांचे आगमन होणार असून ते गडचिरोली येथील निवासस्थानी मुक्काम करणार आहेत.
बुधवार – 01/04/2026 ला,सकाळी 09.00 वा.गडचिरोली येथून कोरची कडे ते प्रयाण करणार आहेत.दुपारी 11.50 वा.कोरची येथे आगमन व पदाधिकारी व कार्यकर्ता सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तद्वतच सोयीनुसार कोरची येथून ते गडचिरोलीकडे प्रयाण व मुक्काम करणार आहेत.
गुरुवार – 02/04/2026 ला,सकाळी 09.00 वा.गडचिरोली येथून कुरखेडा येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम प्रयाण करणार आहेत व दुपारी 11.50 वा.कुरखेडा येथे आगमन होणार असून पदाधिकारी व कार्यकर्ता सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.याचबरोबर सोयीनुसार कुरखेडा येथून गडचिरोलीकडे प्रयाण करुन मुक्काम करणार आहेत.
शुक्रवार – 03/04/2026 ला,सकाळी 09.00 वा.गडचिरोली येथून वडसा कडे प्रयाण करणार आहेत व दुपारी 11.00 वा.वडसा येथे आगमन व पदाधिकारी व कार्यकर्ता सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
याचबरोबर दुपारी 02.30 वा.वडसा येथून आरमोरी कडे प्रयाण करणार आहेत व सायं. 03.00 वा.आरमोरी येथे आगमन होणार असून पदाधिकारी व कार्यकर्ता सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तद्वतच सोयीनुसार आरमोरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण करणार असून मुक्काम करणार आहेत.
आरमोरी विधानसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या कोरची,कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी येथील तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी आपल्या स्तरावर योग्य नियोजन करून हा दौरा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन अनिल उर्फ क्रांती टी.केरामी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरची तालुका यांनी केले आहे.



