खिचपत पडलेल्या नागरिकांना अंधारातून वाट दाखविण्याचे काम वंचित करीत आहे,अंधारलेल्या वाटा नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी वंचितचे वासिद शेख….

ऋषी सहारे

  संपादक

       गडचिरोली- गोकुळनगर मधील शिवनगर , कैकाळी वस्ती व एकता नगर येथील नागरिक अनेक समस्यांना ग्रासले आहेत. अश्या गोरगरीब वंचित घटकांना अंधारातुन बाहेर काढून चांगली विकासाची वाट दाखविण्यासाठी वंचित सहकार्य करीत आहे व पुढे करीत राहणार अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन वंचितचे तालुका प्रमुख वासिदभाऊ शेख यांनी ‘ अंधारलेल्या वाटा ‘ या नाटकांच्या उद्घाटनाप्रसंगी काढले.

        शिवनगर (गोकुळनगर ) येथील आंबेडकर चौकात संमिश्र नाटय मंडळाच्या वतीने ‘ अंधारलेल्या वाटा , या नाटकाचा प्रयोग पार पडला. यात रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की , गोकुळनगर भागातील नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागते , विदयुत ‘ रस्ते , पाणी ‘ शिक्षण अश्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रस्तापित राजकारण्यांनापेक्षा वंचित त्यांच्या समस्या सोडवित आहे. रिपाई त्यांच्या पाठीसी आहे.

        या प्रसंगी वंचित चे जिल्हाध्यक्ष बाळू ढेभुर्णे म्हणाले की , गोकुळनगर येथील काही भागातील नागरिकांना दैनदिन समस्यांना समोर जावे लागते वंचित बहुजन आघाडी त्यांच्या समस्या सोडविण्यास कंटिबंद्ध असुन मात्र नगर परिषद निवडणुक आली की प्रस्तापित पक्षाच्या लालीपाप ला बळी पडतात. असे होता कामा नये. वंचित सदैव तुमच्या पाठीसी आहे. वंचित काम न करता ढेंभा मिरवण्याऱ्या पैकी नाही.

          याप्रसंगी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि . के. बारसिंगे , नाटककार शिद्धार्थ गोवर्धन यांचेही समोचित भाषणे झालीत. नाटकाच्या कार्यक्रमाप्रसंगी वंचित चे चंदुभाऊ नैताम , माजी नगरसेविका निलिमा राऊत , सामाजीक कार्यकर्ता शरद लोणारे , उरकुडे मॅडम , रायपूरे , लोणारे , रसिका चुनारकर , मोनिका संजय मेश्राम , योगीता कारेते , जास्वदा रविंद्र मेश्राम , पल्लवी रामटेके , गिता अशोक बावणे , स्वप्ना दिवाकर खोब्रागडे आदि सहीत बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.