प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सौ.सवीता सुरजराव नरुलें या नगरपरिषद चिमूर च्या सार्वत्रिक निवडणूकी अंतर्गत प्रभाग १ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत.त्यांना प्रभाग क्रमांक १ च्या मतदारांचा भक्कम पाठिंबा असून त्या विजय होण्यासाठी सर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे व प्रभाग क्रमांक १ चा विकास साधणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सुरजराव नरुले पत्रकार तथा त्यावेळी भाजपाचे पदाधिकारी असतांनाही चिमूर नगरपरिषदेच्या मागील कालखंडात प्रभाग क्रमांक एक मधील पाण्यासह इतर समस्यांकडे माजी नगराध्यक्ष सौ.शिल्पाताई राचलवार,माजी नगरसेविका सौ.छायाताई कांचलवार व दस्तूरखुद्द आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी लक्ष दिले नाही.
चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक १ येथील नागरिकांच्या महत्वपूर्ण पाणी समस्यांकडे दुर्लक्ष लक्ष केले असल्याचे मत उमेदवार सौ.सवीताताई सुरजराव नरुलें यांचे म्हणणे आहे.
वार्ड क्रमांक १ चे नागरिक व महिला भगिनी सातत्याने स्वच्छ व नियमित पाण्यासाठी धडपड असतांना,संघर्ष करीत असतांना आमदार किर्तीकुमार भांगडीया सह भाजपाच्या माजी नगराध्यक्ष सौ.शिल्पाताई राचलवार,भाजपाच्या माजी नगरसेविका सौ.छायाताई कांचलवार लक्ष दिले नाही व वार्ड क्रमांक १ च्या नागरिकांना व महिलांना स्वच्छ पाण्याची तात्पुरती तथा मुबलक सुविधा करुन देण्यात आली नाही.आजही या वार्डातील नागरिकांना व महिलांना स्वच्छ आणि गोड पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने,या वार्डातील मतदार भाजपावर .कमालीचे नाराज असल्याचे दिसून येते आहे.
तद्वतच या वार्डात पुरेसे इलेक्ट्रिक पोल नाही,नाल्यांचे बांधकाम पुरेसे नाही,सत्ता पक्षाच्या वरदहस्त आशिर्वादामध्ये प्रभाग १ मध्ये निकृष्ट दर्जांच्या रस्त्यांची व नाल्यांची बांधकामे करण्यात आली आहेत,या वार्डात इमला बांधून राहात असलेल्या नागरिकांना जागेचे मालकी हक्क पट्टे देण्यात आले नाही.त्यांना टॅक्स पावती देण्यात आल्या नाहीत,अशा अनेक समस्याला अपक्ष उमेदवार सौ.सवीता सुरजराव नरुलें न्याय देणारे आहेत.
याचबरोबर नागरिकांच्या मुलभूत व बाह्य मुलभूत अधिकारांवर अंकुश लावण्याचे काम चिमूर नगरपरिषद व चिमूर तहसील कार्यालयाच्या द्वारे करण्यात आले आहे.
वरील सर्व समस्या निकाली काढण्यासाठी प्रभाग १ च्या अपक्ष उमेदवार सौ.सवीता सुरजराव नरुलें या करणार आहेत.यामुळे सौ.सवीता सुरजराव नरुलें यांना निवडणूक देण्याचे आवाहन पती सुरजराव नरुलें,महिला मंडळाच्या महिला भगिनीं,नवतरुण,युवक,मतदार बंधु-भगीनींनी केले आहे.
या प्रभाग १ ची मतदार संख्या २ हजार ७०० च्या वर असून या वार्डात,वडाळा पैकू,वडाचे झाड,हनुमान मंदिर ते पावशी आंबा,सरळ तिरखूरा रोड,पोलिस स्टेशनच्या मागचा पुर्ण परिसर येतो आहे.
अपक्ष उमेदवार सौ.सवीता सुरजराव नरुलें यांचे चुनाव चिन्ह,”छत्री,असल्याचे उमेदवार यांनी सांगितले आहे.
अपक्ष उमेदवार सौ.सवीता सुरजराव नरुलें या तडफदार,कर्तव्यदक्ष,कार्यक्षम,संवेदनशील,व कुणालाही न भिणाऱ्या उमेदवार आहेत.
यामुळे त्या प्रभाव क्रमांक १ च्या नागरिकांच्या व महिलांच्या समस्यांना प्राधान्याने महत्व देतील आणि वार्डातील समस्या निकाली काढतील असे सदर वार्डातील मतदारांचे म्हणणे आहे.



