Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ४ चा नवा संकल्प : “नागरिकांना अभिमान...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ४ चा नवा संकल्प : “नागरिकांना अभिमान वाटेल अशी विकासकामे करणार!.. — प्रभाग ४ मध्ये भाजपच्या कांचन येळवंडे व गोविंद उर्फ सागर कुऱ्हाडे यांची प्रचारात जोरदार आघाडी…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी – नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना प्रभाग क्रमांक ४ मधील उमेदवारांनी “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असे विकासकाम करणार” असा ठाम संकल्प मांडत प्रचाराला वेग दिला आहे. रस्ते-विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा याबाबतचे आराखडे मतदारांसमोर मांडत जनसंपर्क मोहीम अधिक जोम धरत आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपच्या कांचन येळवंडे आणि गोविंद उर्फ सागर कुऱ्हाडे यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून नागरिकांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळत आहे.

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य…

        कांचन येळवंडे यांनी प्रभागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणार असून अअनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ. “यापुढेही नगरपरिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक सेवा–सुविधांचे जाळे उभे करण्याचा मानस आहे. सामाजिक विकासाला आमची प्राधान्यक्रमात सर्वोच्च जागा असेल,” असे त्या म्हणाल्या.

गोविंद उर्फ सागर कुऱ्हाडे यांचे मनोगत…

       गोविंद उर्फ सागर कुऱ्हाडे यांनी प्रभागातील पायाभूत सुविधांना नवी गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

      “आळंदीच्या वाढत्या लोकसंख्येला पूरक अशी रस्तेव्यवस्था, स्वच्छता, ड्रेनेज यांची शाश्वत उभारणी आमचे प्रमुख ध्येय आहे. तरुणांसाठी क्रीडा सुविधा, रोजगार मार्गदर्शन आणि सुरक्षित, सुबक प्रभाग उभारणे ही माझी प्राथमिकता आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद असून त्याला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी म्हटले.

         प्रभाग ४ मधील भाजप उमेदवारांचा वाढता जनाधार, ठोस विकासदृष्टी आणि प्रभागनिहाय नियोजन पाहता दोन्ही प्रभागातील निवडणूक लढत चांगलीच रंगत चालली आहे.