Home Political प्रभागासाठी निष्ठेने काम करणार : प्रमोद गजभिये… 

प्रभागासाठी निष्ठेने काम करणार : प्रमोद गजभिये… 

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताच तरुणाईत उत्सुकता वाढवणारे नाव म्हणजे प्रमोद उर्फ पिंटुभाऊ मनोहर गजभिये विकासाठीची स्पष्ट दृष्टी प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाय मांडण्याची पद्धत आणि महिलांचे नेतृत्वाला चालना देण्याचा निर्धार यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

       त्यांना प्रभागातल्या समस्या अपेक्षा आणि विकासातील अडथळे चांगलेच माहित आहेत प्रभाग सहाचा सर्वांगीण विकासाने नव्या पिढीसाठी सुरक्षित सुविधा संपन्न परिसर उभारणार हे त्यांचे ध्येय व स्वप्न आहे भाजपने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास ते कामाच्या माध्यमातून सिद्ध करणार असल्याचे समजते.

        प्रमोद गजभिये यांचा विकासाभिमुख प्रचार असून परिसरात त्यांच्या प्रचार मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील प्राथमिक सोयी सुविधांची उभारणी रस्त्यांचे शुशोभीकरण पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर भूमिका मांडत भाजपचे प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार म्हणून प्रमोद गजभिये मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

        प्रमोद गजभिये यांची संघटनात्मक बाजू प्रभागात मजबूत असून कार्यकर्त्यांनी मतदारा पर्यंत जनसंपर्क मोहीम अधिक जोमाने सुरू केली आहे. यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक सहा मधील निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होणार असे चिन्ह दिसून येतात.