Home देशविदेश नवजीवन कॉन्व्हेन्ट मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा…

नवजीवन कॉन्व्हेन्ट मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

        नवजीवन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आज संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांच्या हस्ते भारताच्या संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली.

        यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना एकसुरात वाचली. प्रशासकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संविधानाचे महत्त्व, त्यातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांचे पालन करण्याची गरज अधोरेखित केली.

       कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित भाषणे, निबंध आणि माहिती प्रस्तुती केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

         शेवटी संपूर्ण शाळेमध्ये “संविधानाच्या मूल्यांना आचरणात आणू” असा संकल्प करण्यात आला आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.