अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- चांदूर रेल्वे सोन्याची खोटी अंगठी खरी असल्याचे भासवून ४० हजार रुपये उकळल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) माहितीच्या आधारे चांदूर रेल्वे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना आझाद चौक येथील वर्मा ज्वेलर्स दुकानात घडली.
फिर्यादी सचिन बजरंगलाल वर्मा (वय 52, धंदा – सावकार, रा.आझाद चौक, चांदूर रेल्वे) हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता आपल्या दुकानात उपस्थित होते. त्यावेळी एलसीबीचे पथक दुकानात आले आणि त्यांनी फिर्यादींना सांगितले की सागर अरुणराव कडू (रा. चांदूर रेल्वे) नावाच्या व्यक्तीने एक ते दीड महिन्यांपूर्वी त्यांच्या येथे सोन्याची अंगठी गहाण ठेवून 40,000 रुपये घेतल्याचे सांगत आहे.
एलसीबी पथक निघून गेल्यानंतर फिर्यादींनी पावतीबुक तपासले असता सागर कडू यांच्या नावाने 40,000 रुपयांची पावती नोंद असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ एलसीबीला माहिती दिली असता ‘ही स्कॅमसदृश फसवणूक असून अंगठी खोटी असल्याची शक्यता’ असे पथकाने सांगितले.
फिर्यादींनी अंगठीची पुन्हा तपासणी केली असता ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. खोट्या सोन्याची अंगठी गहाण ठेवून 40,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने चांदूर रेल्वे पोलिसांनी सागर अरुणराव कडू याच्याविरुद्ध भा.द.वि. कलम 420 तसेच भा.न्यास संहितेचे कलम 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.

