जनहित याचिकांमागील हेतू शुद्ध असणे महत्वाचे :- प्रा.अविनाश कोल्हे… — संविधान अभ्यास वर्गाला चांगला प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

       पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित संविधान अभ्यास वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुवार,२६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन,कोथरूड येथे हा अभ्यास वर्ग झाला. या अभ्यास वर्गामध्ये ‘ जनहित याचिका ‘ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. हा सहावा अभ्यास वर्ग होता. हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला होत, प्रवेश विनामूल्य होता. दीपक मोहिते यांनी प्रा.कोल्हे यांचा सत्कार केला. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

           प्रा.कोल्हे म्हणाले,’जनहित याचिका हा सक्रिय न्यायव्यवस्थाचा आविष्कार आहे. नागरिकांच्या मूलभूत आणि कायदेविषयक हक्कांचे रक्षण करण्याचे काम जनहित याचिकांद्वारे केले जाऊ शकते. नेहमीची कोर्टकचेरीची प्रक्रीया जनहित याचिकांच्या संदर्भात लवचिक केली जाते. या संकल्पनेची सुरवात अमेरिकेत झालेली असली तरी भारतात १९८० मध्ये जनहित याचिकांना सुरवात झाली. उच्च न्यायालयाला आलेली पत्रे, बातमी, तारा सुध्दा जनहित याचिका म्हणून दाखल होऊ शकतात.

          खासगी व्यक्ती, स्थानिक प्रशासन, राज्य शासन तसेच केंद्र सरकार विरूध्द अशा याचिका करता येतात. दिल्लीतील प्रदूषण, भवरी देवीवरील अत्याचार, बंधुआ मुक्ती मोर्चा, अशा अनेक यशस्वी जनहित याचिका ची उदाहरणे यावेळी त्यांनी दिली. चुकीच्या मुद्द्यांवर जनहित याचिका दाखल केल्यास दंड होवू शकतो. त्यामुळे अशा याचिकांचे गांभीर्य देखील टिकुन आहे. याचिका मागील हेतू शुद्ध असणे महत्वाचे आहे, असेही प्रा. कोल्हे यांनी सांगीतले.