निरा नरशिंहपुर गावच्या सरपंच पदी अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड…. — लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी ठेवुन गोर गरिबांचे प्रश्न सोडवा व गावचा विकास जोमाने करा :- पंचायत समिती सदस्य प्रदीपमामा जगदाळे….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           निरा नरशिंहपुर तालुका इंदापूर येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड झाली.

             निवडी प्रसंगी सरपंच अर्चना सरवदे बोलत आसताना म्हणाल्या की लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे व नरसिंहपूर गावाने माझ्यावर दिलेला विश्वास म्हणूनच मी गावची सरपंच झाले. याचा मला आज आनंद होत आहे. गावच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन गावचा विकास इथुन पुढे जोमाने करूया व गोर गरिबांचे प्रश्न मार्गी लाऊ सरपंच अर्चना सरवदे यांचे निवडी प्रसंगी उद्गार .नरशिंहपुर गावच्या सरपंच पदावर अर्चना सरवदे यांनी पदभार घेतला.नरशिंहपुर येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक झाली. त्या ठिकाणी सरपंच म्हणून अर्चना सरवदे यांची बिनविरोधी निवड झाली.

          माजी सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत सरपंच म्हणून अर्चना नितीन सरवदे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.

         सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस बी हजारे, ग्रामसेवक महेश मेत्रे, तलाठी शिवाजी बिराजदार यांनी कामकाज पाहिले. 

        या निवडणुकी साठी माजी सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे, ग्रामपंचायत सदस्य ,,सुनील भीमराव मोहिते, कोमल किशोर मोहिते, गुरुदत्त विठ्ठल गोसावी, जयश्री दशरथ राऊत, रूपाली उमेश कोळी, विठ्ठल ज्ञानदेव देशमुख, रेणुका आनंद काकडे, ग्रामसेवक महेश मेत्रे, तलाठी शिवाजी बिराजदार, या सर्वांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पाडण्यात आली.

          या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य प्रदीपमामा जगदाळे, नरसिंहपुर गावचा जाणता राजा नरहारी काळे, आण्णासाहेब काळे, चंद्रकांत सरवदे, माजी सरपंच अश्विनी सरवदे, विजय सरवदे, जगदीश सुतार ,दशरथ राऊत ,नाथाजी मोहिते ,शहाजी पावशे, आबा मोहिते, अर्जुन घोगरे, मेननाथ सरवदे, तुकाराम भंडलकर, लखन सरवदे, प्रशांत बादले, सयाजी पवार ,, चंद्रकांत लोंढे, नेताजी लोंढे ,शिवाजी दळवी,आधी ग्रामस्थ व गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            सरपंच पदाच्या निवडणुकी नंतर सरपंच पदी अर्चना सरवदे, यांची बिनविरोध निवड झाल्यावर यांचा सन्मान पंचायत समिती सदस्य प्रदीप मामा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला, तर सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे,सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, तसेच सर्वच ग्रामपंचायत सदस्य, व पत्रकार बांधवांचा देखील यावेळी सन्मान प्रदीपमामा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.