अनुसूचित जमातीच्या लोकांनी शबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा.

 

ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली, : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि. गडचिरोली अंतर्गत अनु. जमाती व माडीया लोकांना शबरी घरकुल योजने अंतर्गत ग्रामिण भागाकरीता घरकुल योजना राबविण्यात येत असून अनुसूचित जमाती व माडिया लोकांनी प्रकल्प कार्यालय, अहेरी पंचायत समिती, अहेरी / मुलचेरा / सिरोंचा येथे संपर्क साधून विहित अर्ज प्राप्त करुन परिपुर्ण आवश्यक कागदपत्रासह दिनांक ३०.०९.२०२३ पर्यंत सादर करावे. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (नियो.), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जिल्हा. गडचिरोली यांनी कळविले आहे.