अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मित्र ठार… — सिंदेवाही तालुक्यातिल वीरव्हा येथील घटना…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही

सिदेवाही तालुक्यातील नवीन विरवा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. 

          मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर वृत्त असे की मृत दादाजी शिवराम सावसाकडे वय 65 वर्ष व उदालक केशव हजारे वय 50 वर्ष दोन्ही मित्र राहणार नवीन वीरवा हे गणपती पाहून फिरायला विरवा बस्थानकाकड़े निघाले. असता अज्ञात वाहनाने या दोघांना धडक दिली या धडकेमध्ये एक जागेत ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. याची माहिती सिदेवाही पोलीस स्टेशनला मिळताच सिदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण पीएसआय सागर महल्ले पोलीस शिपाई रणधीर मदारे ट्राफिक पोलीस संजीवराव गडेकर घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. असता जख्मी उदालक धाकदुकी वर होता तुषार चव्हाण यांनी ॲम्बुलस ची वाट न बघता स्व:ता पोलीस गाडीमध्ये मृत दादाजी व जखमी उदालकला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे आणले असता त्यात जखमी उदालक याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

          अज्ञात वाहनाची सिंदेवाही पोलीस शोध करीत आहे.पोलिसांची कौतुकदार कामगिरी याआधी पण ठानेदार तुषार चव्हाण यांनी अपघातात जख्मी व मृत झालेल्या वेक्तिला स्व:ता उचलून रुग्णालयात आणले आहे.