फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन…

 

ऋषी सहारे

संपादक

        गडचिरोली, : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन २०१९ पासून करण्यात येत आहे. सन २०२२ मध्ये Fit India Quiz २ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळण्याविषयक असलेले ज्ञान, कौशल्य इ. साठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. भारतीय खेळांचा समृद्ध इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू इ. बाबत विद्यार्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश असून यामध्ये रु. ३.२५ कोटींच्या बक्षीसांचे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले.

        याप्रमाणेच केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे Quiz ३ चे आयोजन करण्यात येत आहे. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच आहे. पुर्ण भारतभर यासाठी विद्यार्थांची नोंदणी ५ सप्टेंबर, २०२३ पासून सुरु झाली आहे आणि ५ ऑक्टोंबर २०२३ ही नोंदणी करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in/ या कार्यालयीन वेबसाईटवर त्यांच्या विद्यार्थांची नोंदणी करुन शकतात.

           उपरोक्त प्रश्नमंजुशामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व शाळा यांनी सहभाग नोंदवावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे आवाहन करीत आहेत.