Home Political मेळ्याच्या प्रसंगी शिवसेना (शिंदे) गटात अनेक महिला कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश…  —...

मेळ्याच्या प्रसंगी शिवसेना (शिंदे) गटात अनेक महिला कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश…  — विविध पदावर महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशीवणी :- शिवसेना ( शिंदे ) गटातंर्गत रामटेक विधानसभा क्षेत्राची बैठक नागपुर जिल्हा ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्ष करुणा आष्टनकर व जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा कुभलकर यांचे प्रमुख उपस्थितित २७ ऑगस्ट २०२५ ला पार पडली.

       याप्रसंगी महीला जिल्हाप्रमुख करूणाताई आष्टनकर,कामठी, उमरेड,रामटेक विभाग प्रमुख जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभाताई कुंभलकर यांचेसह पक्षाचे अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

       या बैठकीत उपस्थिती मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच पक्ष वाढविण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचून केलेल्या विकास कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचणे गरजेच असल्याने मनोगत महिला सेना जिल्हा प्रमुख करुणा आष्टनकर यांनी व्यक्त केले. 

        यावेळी पक्षावर विश्वास ठेवत अनेक महिलांनी प्रवेश घेतला.पक्षप्रवेश होताच अनेक महिलांना महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. 

       यात महीला तालुका प्रमुख उषाताई राजेन्द्र शिवारउके,पारशिवनी शहर प्रमुख अर्चनाताई तरार,उपतालुका प्रमुख शितल गजभिये,करंभाड जिल्हा परिषद विभाग प्रमुख स्नेहा भुजाडे,पस. करंभाड विभाग प्रमुख रूनाली जगनाडे,नयाकुंड पस.विभाग प्रमुख रीना शेंडे,शहर सचिव पदी किरण आहाके आदीचा समावेश आहे. 

      समस्त नवनिर्वाचित नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

         बैठकीच्या यशस्वितेसाठी महिला शिवसेना ( शिंदे ) पदाधिकारी व महिला कार्यकर्ता शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.