कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
नागपुर जिल्हा शहर व ग्रामीण कुस्तीगीर संघाच्या जिल्हाध्यक्ष आमदार श्री.संदिप जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती सुरेश भट सभागृह येथे शहर व ग्रामीण कुस्तीगीर संघ अध्यक्ष,पारशिवनी तालुक्याच्या कुस्ती खेळासाठी नियंत्रण समीतीच्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक श्री.भिमराव वाडीभस्मे ( साटक) यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका सचिवपदी श्री.मोहन वकलकार ( निमखेडा) व उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर विघे पहलवान,यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री.राकेश हिरामन देशमुख, श्री पुरशोतम पोटभरे यांची नियुक्ती झाली.संयुक्त सचिव श्री.निरज मधुकर डेंगे,श्री.श्रावणजी भोंदे तर कोषाध्यक्ष म्हणून श्री.दादाराव सु.डेगे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य म्हणून किष्णा वामन जामगड़े,महेश वानखेडे,सागर विष्णु नवघरे,सतिश वाडीभस्मे,राहुल प्रकाश पाहुणे,नाना भडंग,कवडु खंडाते,अमर वासुदेव मोहनकर,खोजराज भुते,समिर महल्ले,दिलिप ठाकरे,अन्नाजी दुनेदार,प्रमोद दारोडे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष आमदार श्री.संदिप जोशी यांनी केली व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचना सभागृहात नियुक्ती पत्र देण्यात आले.
याचबरोबर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या व सदस्य गणांचा सलग्न पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्री.ईश्वर मेश्राम,दादाराव डेंगे,पुरुषोत्तम पोटभरे,ज्ञानेश्वर विधे पहलवान व जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य आणि तालुका कुस्तीगीर संघाचे सभासद प्रमुख्याने उपस्थित होते.



