सध्याचा काळ भाजपासाठी सुवर्णकाळ आहे.:-ॲड.धर्मेंद्र खंडारे… — मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे.:-शरद बुट्टे पाटील… — योजना जनतेपर्यंत पोहचविणे आमचे प्रथम कर्तव्य आहे.:-प्रिया पवार… — खेड तालुक्यात मोदी@९ अंतर्गत संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन… 

 

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

      खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. सध्याचा काळ भाजपासाठी सुवर्णकाळ आहे. हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. असे प्रतिपादन भाजपाचे संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खंडारे यांनी केले. खेड तालुक्यातील येथील साईकृपा लाॅन्स सभागृहात भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनावेळी ते बोलत होते.

        यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रिया पवार, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, काळुराम पिंजन, संजय रौंधळ, श्रीकृष्ण देशमुख, शिवकाली खेंगले, सुनील देवकर आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

        खंडारे म्हणाले, ‘केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ध्यास घेतलेल्या भाजपच्या मागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे.

         शरद बुट्टे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे. समाजातील सर्व थरातील नागरिकांसाठी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या गतिमान योजना व लोकहिताची निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत भाजपचे कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत. प्रत्येक कार्यकर्त्यांने १०० घरापर्यंत पोचून नरेंद्र मोदींच्या विविध कल्याणकारी कार्य व योजनांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

       प्रिया पवार म्हणाल्या की, केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी तरुणांनी व महीला भगिनींनी नि:स्वार्थीपणे कार्य केले पाहिजे.