राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न…

 

अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

 

आरमोरी :- दि. २६जुन रोजी आरमोरी शहरातील वघाळा बर्डी येथे लोकराजा, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न झाली. 

      यावेळी प्रा. प्रशांत दोनाडकर,श्रीमती. निलीमा दोनाडकर, युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम, लिलाधर मेश्राम, आदी उपस्थित होते. 

      सर्व प्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. 

       राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे संकल्प प्रत्येक नागरिकाने आजच्या दिवशी घेतले पाहिजे, असे मत प्रा. प्रशांत दोनाडकर यांनी व्यक्त केले.