ग्राम पंचायत मक्केपल्ली चेक न .१ . इथे ग्रामसेवक काम करतो की गायसेवक !.. — बिडीओ यांचा वरहस्त की होणार कार्यवाही..

ऋषी सहारे

संपादक

        गडचिरोली _ चामोर्शी तालुक्यातील रेगडी जवळील ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न . १ मधे ना ग्रामसेवक ना चपराशी परंतु ग्रामपंचायत उघडली होती व त्या ठिकाणी अंदर दोन गायी व बाहेर तिन गुरेढोरे होते. गावकरी दाखल्यासाठी आलेले होते परंतु ग्राम सेवकच हजर नव्हते तर चक्क ग्रामपंचायतीत गायी होत्या तेव्हा दाखला कुणाला मागायचा ग्रामसेवकांला की गायसेवकाला. – – दि २५ मे 2023 ला दुपारी ३ .०० वाजता सा. वैनगंगा पुकार चे पत्रकार रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली हे आपल्या जाहीरात बिलाचा चेक मागण्या करीता गेला असता सदर प्रकार दिसला. सा. वैनगंगा पुकार या शासन लिष्टवर असलेल्या वृत्तपत्रास सन २०२० ला ग्रामपंचायत मक्केपल्ली चेक न. १ मधुन जाहीरात प्रकाशित करण्याकरीता ग्रामसेवक बन्सोड यांनी जाहीरात दिली होती. सदर बिलाचे भुगतान करा म्हणुन तत्कालीन ग्रामसेवक मडावी यांचेकडे प्रा. मुनिश्वर बोरकर पहिल्या भेटीत बिल काढून देतो म्हणाला . दुसऱ्या भेटीत हजर नव्हता , फोन केला तर दोन महिने फोन उचलला नाही. तेव्हा तिसर्‍यांदा बोरकर सर गेले असता ग्रामसेवक किंवा चपराशी हजर नसुन ग्रामपंचायत मधे अंदर व बाहेर चक्क गुरेढोरे होते . झाडाखाली दाखल्यासाठी गावकरी येत होते. त्यांना विचारले असता ग्रामसेवक हप्त्यातून एकदा येतो व गावात हिंडत राहतो. अधिक माहीती काढली असता ग्रामसेवक शिवाजी महा. धानोरा रोड चे समोर गडचिरोली राहतो परंतु फोन उचलत नाही. तेव्हा जाहीरात बिलाची रक्कम गायीला मागायचे काय? सदर महासयावर बिडिओ चामोर्शी चा वरहस्त असुन ग्रामसेवक ग्रामपंचायत मधे गेले काय की नाही याचे बिडिओला काही देणे घेणे नाही. सदर ग्रामसेवकांची तक्रार बिडिओ चामोर्शी यांचेकडे रिपाईचे नेते प्रा. मुनिश्चर बोरकर करणार आहेत . असे प्रकार दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायतमधे सर्वत्र सुरु असुन यावर बिडिओ चे वचकच नाहीं असे बोलल्या जात आहे.