काटकुंभ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…..

   अबोदनगो चव्हाण

चिखलदरा तालुका प्रतिनिधी 

      दखल न्यूज भारत

चिखलदरा:- काटकुंभ येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

            याप्रसंगी प्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काटकुंभ येथील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

           यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उर्मिला मालवीय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री.नामदेव अमोदे शिक्षक व शिक्षीका गावातील नागरिक पालक वर्ग पोलीस कर्मचारी सचिव मँडम ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील नागरिक व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

           त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतून प्रभात फेरी काढून गावातील बाजार चौकात येऊन ग्रायपंचायत येथील ध्वजाचे ध्वजारोहण कुमारी ललीता ताई बेठेकर यांनी ध्वजारोहण केले. 

            त्यानंतर प्रभात फेरी समोर जाऊन येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण कु ललीता बेठे कर सरपंचा यांच्या हस्ते करण्यात आले.शीवा गुरुकुल कॉन्व्हेंट चा ध्वजारोहण शाळेतील अध्यक्ष राजेश आर्य यांनी केले

          त्यानंतर प्रभात फेरी जिल्हा परिषद पटांगणावर पोहोचून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

            या प्रसंगी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

            यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनकाटकुभ ग्रामपंचायत चे सरपंचा कु ललीता बेठेकर ग्रामपंचायत सदस्य श्री.सोनु मालवीय महादेव धुर्वे ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाजी बेठेकर ग्रामपंचायत उपसरपंचा वैशाली राठोड सचिव सौ. मॅडम, सौ. रेखा गोहे ग्रामपंचायत सदस्य , सौ. बाली बेठेकर पाटील, नानीकराम मॅडम ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष योवाश चव्हाण पत्रकार, अबोदनगो चव्हाण मेषक चव्हाण गावातील आरोग्य सेविका आरोग्य सेवक ग्रामपंचायत शिपाई पलसु गाठे रज्जु मालवीय जेम्स चव्हाण निलेश पंडोले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व आजी माजी पदाधिकारी , अंगणवाडी सेविका, मदतनीस व महिला, पुरुष , विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

            या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सौ सचिव मँडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले.