ब्रेकिंग न्युज… अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी…

   अबोदनगो चव्हाण

चिखलदरा तालुका प्रतिनिधी

        दखल न्यूज भारत 

चिखलदरा-: चिखलदरा तालुक्यातील चोबिता या गावात शेतकरी शेतशिवार परिसरात बैल चराई करत असताना अचानक अस्वलने हल्ला करून शेतकऱ्याला गंभीर जखमी केले.

           शेतकऱ्याचे नाव बालाजी सोमा बेठेकर वय 40,राहणार चोबिता असे आहे.त्यांच्यावर आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान अस्वलीने हल्ला केला.या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावर,हातावर,डाव्या बाजल्ला गंभीर जखमा आहेत.

           शेतकऱ्याला प्राथमिक उपचारासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यानंतर पुढील उपचारासाठी सुपर हॉस्पिटल अमरावती येथे पाठवण्यात आले आहे.

          चुरणी येथे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर साहेबलाल धुर्वे व डॉक्टर सुनील चव्हाण यांनी उपचार केले असून पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

**

बॉक्स

         अस्वलीने चिखलदरा तालुक्यातील मौजा चोबिता येथील बालाजी सोमा बेठेकर यांच्यावर हल्ला केला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी चुरणी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले होते.प्राथमीक उपचारानंतर अमरावती येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

           घटनास्थळ पंचनामा केला असून शासकीय नियमानुसार जखमींना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जारीदा प्रादेशिक मसूद खान यांनी,”दखल न्यूज भारतचे चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनागो चव्हाण,यांच्या सोबत बोलताना दिली.