खंडाळा( डुमरी)बसस्टाप जवळ ट्रकने शालेय विद्यार्थिनीस उडविले.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

पारशिवनी : पारशिवनी तालुकातील खंडाळा डुमरी येथे पायी रोड ओलांडत बस स्टाप येथे जात असताना जबलपुर वरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने विद्यार्थिनीस समोरून धडक देत उडविले. त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा (डुमरी) येथे शुक्रवारी (दि. २६) सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.

           जख्मी शालेय विद्यार्थीनी कुमारी कल्याणी सुभाष हिवसे (१६, रा. खंडाळा-डुमरी, ता. पारशिवनी) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सकाळी खंडाळा (डुमरी) येथील बसस्टँड जवळ जात असताना.तेथील रोड ओलांडत असताना जबलपूरहून नागपूरच्या दिशेने निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवत जाणाऱ्या ट्रक क्रमाक एनएल-०१ / एजी- ०२४९ क्रमांकाच्या ट्रकने तिला जोरात धडक देत उडविले. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने लगेच कामठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. धडक देताच चालक ट्रक सोडुन पळून गेला. जख्मी विद्यार्थीनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

           याप्रकरणी चाय दुकानदार तक्रारदार विलास सिताराम ठाकरे वय ३८ रा खंडाळा डुमरी याची तक्रारी वरून पारशिवनी पोलिसांनी अपराध क्रमाक २२/२४ अन्वये कलम२७९,३३७ मोहर वाहन कायदा १८४,१३४ अन्वये गुन्हा नोंद करून अज्ञात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हा चा तपासात पो नि राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात पो. हवा. अज्ञात ड्रायवरचा शोध घेत पुढील तपास सुरू केला आहे.