कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न… — कृषी प्रदर्शनातंर्गत सर्व क्षेत्रातील माहितीसह तंत्रज्ञान पाहावयास मिळणार,नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा.:- जिल्हा बॅक संचालक आप्पासाहेब जगदाळे.. 

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूरच्या (जि. पुणे) वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी मेळाव्यात,जनावरे प्रदर्शन,घोडे बाजार व डॉग शो आदी प्रदर्शन कार्यक्रमांचे उद्घाटन समारंभ शानदार व नेत्रदीपक ठरला.

        यशवंत (तात्या) माने आमदार, मोहोळ विधानसभा यांचे शुभ हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,संचालक आप्पासाहेब जगदाळे,अविनाश घोलप चेअरमन छत्रपती सह. सा. का. लि.भवानीनगर यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

         या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी बाजार समितीचे सभापती विलास माने,उपसभापती रोहित मोहळकर, आमदार यशवंत माने,दत्तात्रय फडतरे,मधुकर भरणे,संग्रामसिंह निंबाळकर,मनोहर ढुके,संदिप पाटील,रूपाली वाबळे,मंगल झगडे,आबा देवकाते, तुषार जाधव,संतोष गायकवाड,अनिल बागल,दशरथ पोळ,रोनक बोरा,सुभाष दिवसे यांचेसह प्रभारी सचिव संतोष देवकर हे होते. 

         कार्यक्रमासाठी आवर्जून इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन श्री.भरत शेठ शहा,माजी संचालक महादेव घाडगे,संचालक हरिदास घोगरे,चेअरमन प्रताप पालवे,अंकुश जाधव,विशाल जी.बोंद्रे,आबा पाटील उपस्थित राहिले होते.

        सर्व संस्थांचे पदाधिकारी,अधिकारी,वि.का.से.सह. सोसायटीचे आजी माजी चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक,ग्रामपंचायतचे आजी- माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य,सर्व शेतकरी बांधव,व्यापारी,हमाल,मापाडी,विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला भगिनी,पत्रकार बंधू,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी,देशातील अनेक राज्यातून आलेल्या कृषी प्रदर्शन प्रेमी या सर्वांच्या उपस्थित संपन्न झाले.

           प्रदर्शनात आधुनिक कृषी प्रदर्शन व अत्याधुनिक शेती साधने व शेती उपयोगी वस्तू २०० स्टॉल,ड्रोनद्वारे औषध फवार इत्यादी, जातीवंत जनावरे प्रदर्शन,घोडे चाल स्पर्धा व नाचकाम स्पर्धा,डॉग शो,शालेय सांस्कृतिक स्पर्धा,महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम व महिलांसाठी खेळ पैठणीचा हा सुप्रसिध्द कार्यक्रम,ऑलम्पिक क्रिडाप्रकार प्रात्यक्षिके,बुलेट,जीप व घोड़ा रायडींगचे विविध थरारक शो तसेच गृहोपयोगी वस्तु,सौंदर्य प्रसाधने,कंड्युमर्स,निवडक खाद्य वस्तुंचे विविध स्टॉल,खवय्यांसाठी खाऊगली ५० स्टॉल व – मुलांसाठी मनोरंजनाचे खेळ इ. चे आयोजन करण्यात येणार आहे. 

            विशेष आकर्षण दीड टन वजनाचा एक कोटी रुपये किंमतीचा ‘गजेंद्र रेडा,ऑल इंडीया चम्पियन.. १ कोटी रुपये किंमतीचा ‘रिबेल घोडा’ हे होते.

          हे प्रदर्शन विनामुल्य होते.दि. २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते रात्री ९.०० व दि. २५ ते दि. २८ जानेवारी २०२४ सकाळी १०.०० ते रात्री ९.०० पर्यंत चालणार आहे.

         उपसभापती रोहित मोहोळकर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.