कोजबी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…..

अश्विन बोदेले

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

कोजबी :- आरमोरी तालुका मुख्यालयापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     याप्रसंगी प्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.विनोद मानकर यांच्या हस्ते हजारोहण करण्यात आले. 

             ध्वजारोहण प्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री.विश्वनाथजी सोनटक्के सर,श्री.प्रशांतजी ठेंगरे सर,शिक्षिका सौ.राऊत मॅडम व ग्रामपंचायत पदाधिकारी,गावातील नागरिक व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

           ध्वजारोहणा नंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतून प्रभात फेरी मार्गक्रमण करीत गावातील गांधी चौकात आली व गांधी चौकातील ध्वजाचे ध्वजारोहण सौ.लोचना जुमनाके ग्रामपंचायत सदस्य कोजबी यांच्या हस्ते करण्यात आले.

           यानंतर प्रभात फेरी मार्गक्रमण करीत गावातील पाटील चौक येथे पोहचली व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.बुधराज गेडाम यांच्या हस्ते पाटील चौकातील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. 

           तद्वतच पुढील कार्यक्रमाकरीता प्रभात फेरी कोजबी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पोहचली व तेथील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच सौ.कविता ताडाम यांच्या हस्ते करण्यात आले.

             नंतर प्रभात फेरी जिल्हा परिषद शाळेतील पटांगणाकडे वळली व सदर शाळेच्या मुख्य समारोहाला सुरुवात झाली.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

            प्रजासत्ताक दिनाच्याप्रसंगी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

            प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोजबी ग्रामपंचायत चे सरपंचा सौ.कविता ताडाम ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.अविनाश गेडाम ग्रामपंचायत सदस्य कोसबी,श्री.मनोहरजी मोरांडे ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विनोद मानकर,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री.रोहिदास सहारे,ग्रामपंचायत कोजबीच्या सचिव सौ.ढोरे मॅडम,सौ.पुनम बोदेले ग्रामपंचायत सदस्य,सौ.लोचना जुमनाके,सौ.पाटील मॅडम,सौ.कुमरे मॅडम ग्रामपंचायत सदस्य,तसेच गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.ईश्वरजी मेश्राम,भीमरावजी मुलेवार,गुलाबजी ताडाम,जगदीश कुंमरे,अश्विन बोदेले पत्रकार,गावातील आरोग्य सेविका धोटे मॅडम,आरोग्य सेवक बोरकरजी,अरुणा जनबंधू,भाविका बनकर,गुलाब जुमनाके,ग्रामपंचायत शिपाई रोशन दुमाने,मोरेश्वर सयाम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व आजी माजी पदाधिकारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस व महिला,पुरुष, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

      या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री ठेंगरी सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले.