ईटगाव येथे भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा २८ नोव्हेंबरला होणार समारोप.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- 

        पारशिवनी तालुक्यातील ईटगाव येथे श्री रामूजी काकडे यांच्या घराच्या पटागणात 21 ते 28 नोव्हेंबर पर्यंत संगीत मय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरु असणार आहे.

        भागवत कव्याकार हभप श्री.ईश्वर गुर्वे महाराज आळंदीकर यांचा संगीतमय श्रीमद भागवत कथा चे दररोज सकाळी 10 वाजता ते 12 बाजे पर्यंत आणी रात्रि 8 वाजता ते 10 बाजे पर्यंत सात दिवसीय भागवत ज्ञानयज्ञ कीर्तननाचे आयोजन करण्यात आले.याचबरोबर दररोज सकाळी काकड़ा आणी सांयकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.भागवत कथाकार यांचे सहकारी हभपं वामन दांडेकर ( नागपुर), हभप चेतन नांदुरकर ( आर्वी), घनश्याम जैवारे,गुणवंत हिवरकर,अक्षय काळे ( सौसर) हे सर्व कार्यक्रमातंर्गत सहकार्य करीत आहे.

           भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाच्या अर्तगंत २७ नवंबरला रात्रि हभप मोनालीताई महाराज इंगळे याचे समारोपिय भागवत कथा जानयज्ञ होणार असून भागवत कथा सोहळ्याच्या शेवटी किर्तनच्या काल्या करिता भागवत कथाकार ईश्वर गुर्वे महाराज आणी मोनालीताई महाराज यांचे किर्तन २८ नवंबरला सकाळी ११ वाजता ते ४ बाजे पर्यंत होणार असल्याची माहीती श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजक प्रमुख श्री.रामुजी काकड़े यांनी दिली आहे.

        भागवत सोहळा यशस्वी करण्या करिता रामु काकडे,अनिताताई काकड़े,शेषरावजी काकडे,वनीताताई काकडे,गणेशजी जूनघरे,प्रदुण्या गायकवाड,दिक्षिता काकड़े,गौरव मेघर,लीलाधर मेघर,सेजल काकडे,प्रणय जूनघरे,अमित काकडे,चेतन काकडे आणी ईटगाव गावातील संमस्त गावकरी मंडळी सहकार्य करीत आहेत व ज्ञान कथेचे एकाग्र चित्ताने स्मरण करीत आहेत.