शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष पदासाठी आण्णासाहेब काळे यांच्या नावाची बावडा /लाखेवाडी गटात सर्व तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा सूर…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांन मध्ये माजी सरपंच आण्णासाहेब काळे यांच्या नावाची चर्चेला सुरुवात.

          निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका शिवसेना शिंदे गट प्रमुख या रिक्त झालेल्या जागेसाठी कार्यकर्त्यामध्ये कोणाची निवड होणार याकडे लक्ष वेधी लागलेले आहे.

         यापूर्वीचे नियुक्त आसलेले तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यामध्ये प्रवेश केला आसून तालुका शिवसेना शिंदे गट प्रमुख पद रिक्त झालेले आहे.

          नीरा नरसिंहपूरचे माजी सरपंच आण्णासाहेब काळे यांच्या नावाची कार्यकर्त्यांन मधून सर्व तोपर्यंत जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

          माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते महाराष्ट्र राज्य विजय बापू शिवतारे यांचे अतिशय जवळकीचे व विश्वासू कार्यकर्ता म्हणून आण्णासाहेब काळे यांचे नाव प्रामुख्याने आघाडीवर आसल्याचे समजले.

          मिडीयाशी बोलत आसताना माजी सरपंच आण्णासाहेब काळे म्हणाले की महाराष्ट्राचे धाडसी व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी व इंदापूर तालुक्यात शिवसेना वाढवण्यासाठी आणि जनतेची सेवा व न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करण्याची संधी मिळावी व तालुक्यात गाव तिथे शाखा काढण्याचे अधिक माझे उद्दिष्ट आहे. आण्णासाहेब काळे यांचे यावेळी उद्गार यानिमित्त इंदापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते.

         आण्णासाहेब काळे हेच शिंदे गट तालुका अध्यक्ष होतील आसा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.