शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची आज,”संविधान महासन्मान,सभा.. — राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर देणार महत्वपूर्ण माहिती…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका

          संविधान आहे तर देशातील नागरिकांचे हक्क कायम आहेत व हक्कातंर्गत मनमोकळीक जिवंतपणा सर्व नागरिकांत आहे.संविधान नाही तर देशातील बहुजन समाज वैचारिक,मानसिक व धार्मिक दृष्ट्या गुलाम.

       म्हणूनच संविधान समजून घेणे व समजून सांगणे आता महत्वाचे झाले आहे.याचाच महत्वपूर्ण भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर विशाल,”संविधान महासन्मान,सभा आज होत आहे.

         सदर सभेला उपस्थित लाखो बांधवांना व भगिनींना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.याचबरोबर वंचितचे इतर वरिष्ठ नेतागण व पदाधिकारी संबोधणार आहेत.

            मुंबईचे शिवाजी पार्क मैदान भयंकर मोठे असून ५ लक्ष क्षमतेचे असल्याचे बोलले जात आहे.हे मैदान आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेले असेल.

             “संविधान महासन्मान,सभेला अनुसरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजकीय दिशा देण्याचे काम सुध्दा अँड.प्रकाश आंबेडकर करतील असे संकेत आहेत.

            “संविधान महासन्मान,सभेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मुंबई कडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.

हेच ते मुंबईचे(दादर येथील) विशाल शिवाजी पार्क मैदान..