मी आय.ए.एस.अधिकारी होणारच, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न… — निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय तर्फे विद्यार्थ्यांशी साधला संवाद….

उमेश कांबळे ता प्र भद्रावती

 

दि 24 सप्टे ला स्थानिक कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, येथे ‘मी आय. ए. एस ‘अधिकारी होणारच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

         या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. नरेशचंद्र काठोळे सर, संचालक मिशन आय. ए.एस. अकॅडमी अमरावती यांनी खेळीमेळीच्या भाषेतून त्यांच्या अकॅडमी बद्दल माहिती दिली व आय ए एस अधिकारी होण्याचा सोपा मार्ग सांगितला. मेहनतीशिवाय काहीही साध्य होत नाही व केलेली मेहनत वाया जात नाही असे मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

         या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. दिलीप झळके, माजी अप्पर आयुक्त, नागपूर शहर यांची उपस्थिती लाभली. कोणतेही कार्य करताना नियोजनाची गरज असते व नियोजनातून केलेले कार्य पूर्णत्वास जाते व यशस्वी होण्याकरिता शिस्त, नियोजन, श्रम आणि वाचन या गुणांची सांगड घालणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

         कार्यक्रमाचे संयोजक रविंद्र तिराणीक, जनमंच सदस्य, नागपूर व महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. अश्या प्रकारच्या कलेच्या माध्यमातून पूर्व, बुद्धीचा विकास कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कार्तिक शिंदे, सचिव भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी आपल्या भाषनातून ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत रुजू करण्याचे आपन व्रतच घेतले आहे असे प्रतिपादन केले .

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होण्याचे महत्व पटवून सांगितले व स्वयंअध्ययन करने गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात श्रीकांत देवळे, प्रमोद रामकर, कार्यकारी सदस्य, जनमंच नागपूर यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सीमा बोभाटे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा .प्रणाली नरड यांनी केले, तर आभार प्रा. रेश्मा नरई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. डॉ. प्रशांत पाठक, प्रा. पियुष लांडगे, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. प्रमोद पाठक, अमजद खान, कु. तनुश्री बावणे, श्रीमती को, इंदिरा निखाडे यांनी अथक परिश्रम घेतले. मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.