गट ग्रामपंचायत बिटोली (भुलेवाडी) येथे जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार अँड आशिष जैस्वाल याचे हस्ते भूमिपूजन..

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-

    पारशिवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत बिटोली (भुलेवाडी) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी, विहीर व बंधारा बांधकामांचे,तसेच गावा अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन अशा एकुण- रु ९५ लक्ष विकास कामांचे भूमिपूजन आमदार अँड आशिष जैस्वाल याचे हस्ते करण्यात आले.

         याप्रसंगी आमदार अँड जैस्वाल यांनी बिटोली भुलेवाडीसह जवळ पासच्या गावकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहीती देत आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी बिटोली गट ग्राम पंचायत सरपंचा सौ. संध्याताई चौधरी,उपसरपंच श्रीं.देवमनजी दोडके,ग्रामपंचायतचे सदस्य,पारशिवनी शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक श्री.राहुल ढगे,शिवसेना कोलितमारा सर्कल प्रमुख माजी सरपंच श्री. प्रेम भोंडेकर,ग्राम पंचायत सदस्या सौ. चित्राताई वाटकर,श्री.साहेबराव वाटकर,सामाजिक कार्यकर्ता श्रीं. गौरव पनवेलकर,श्री.रोशन पिंपळकर,श्री.नरेश चौधरी,श्रीं. किशोर चौधरी,श्रीं.अक्षय दोळके,श्रीं.मनोज पालीवाल,श्रीं.चेतन गावंडे,श्री.बापुराव दिवटे व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.