अमृत चा अमृत काळ आला, पण पाणी कधी :- आप चंद्रपुर…

 

ऋषी सहारे

संपादक

              आपल्याला माहित आहे कि चंद्रपूर महानगर पालिका कडून जागो जागी नवनवीन रस्ते फोडून अमृत ची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. गल्लोगली ते घरा पर्यंत पाईप गेले पण तोट्या नाही, तोट्या आले तर पाणी नाही ताळमेळ एकाला नाही आणि सत्ता तर कुणाची नाही , प्रशासक कार्य बघतोय याचा अर्थ काय, जनतेला कळत नाही . कोट्यावधी रुपये खर्च करून टाकण्यात आलेल्या अमृत ला पाणी नाही. मग कसले अमृत ? उन्हाळ्याच्या या उष्म गर्मी मुळे जनतेचे लाही लाही होत आहे पन जनतेला काही पाणी मिळत नाही आहे असे दिसून येते . चंद्रपूर मधील अनेक भागात पाणी नाही, पाईप लाईन नाही, तोट्या नाही, मग कोट्यावधी रुपये देले तरी कोणाला व का असा प्रश्न माजी सौनिक तथा आम आदमी पार्टी चंद्रपूर उपाध्यक्ष सुनील सदभैया यांनी जनतेसमोर व्यक्त केले . सिवील लाईन परिसरात चपराशी कॉलनी, रामनगर, सिंधी कॉलोनी, मित्र नगर, अश्या अनेक ठीकानी पाणी नसल्याचे स्वाक्षरी घेत आप टीम ने आयुक्त मनपा याना पत्र दिले.

      अमृत चे पाणी जनतेला मिळावे करीता आम आदमी पार्टी लढा देत आहे . मनपा चे अतिरिक्त आयुक्त यांना दिनांक २२ मे २०२३ रोजी पत्र द्वारे विनती करण्यात आली कि जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाला कमी करावे तत्काळ अमृत चे पाणी आम जनतेला देण्यात यावे. करीता निवेदन सादर करण्यात आले . पुढील १५ दिवसात अमृत चे पाणी जनतेला मिळाले नाही तर अमृत योजना फेल असे फलक मनपा ने लावण्यात यावे व जनतेच्या पैश्याची नासाडी करीता मनपा ने माफी मागवी करीता आंदोलन करनार आहोत असे महानगर अध्यक्ष योगेश गोखले यांनी कळविल्या चे कळते . निवेदन देते वेळी शहर संघटन मंत्री सिकंदर सागोरे, सह संघटन मंत्री भीमराव मेंढे, सहसचिव सुधीर पाटील, झोन 1 कोषाध्यक्ष नागसेन लभाने आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.