शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर – साहित्य,शैक्षणिक क्रीडा,संगीत,सामाजिक व कला क्षेत्रातील कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपची चंद्रपूर निवासी सरोज देवगडे ही एक सदस्य झाल्याची माहिती मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी एका भेटी दरम्यान चंद्रपूर मुक्कामी दिली.
सरोज देवगडे ही उच्च शिक्षित तरुणी असून सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रेसर राहत असतात.
दरम्यान नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांनी सरोज देवगडे सहज सुचलं गृप मध्ये सहभागी झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.



