ग्रीनफ्रेंड्सतर्फे नेचर पार्कवर ‘खेळा होळी -इकोफ्रेंडली’ कार्यक्रम… — लाखनी निसर्गमहोत्सवानिमित्ताने स्वच्छता अभियान, सांकेतिक केरकचरा होळी तसेच नैसर्गिक रंग बनवा स्पर्धाचे आयोजन…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

लाखनी:-

  लाखनी निसर्गमहोत्सवाअंतर्गत ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व नगरपंचायत लाखनी यांचे तर्फे लाखनी बसस्थानकावरील नेचर पार्कवर “खेळा होळी- इको फ्रेंडली’ कार्यक्रमाचे आयोजन लागोपाठ 18 व्या वर्षी अखंडपणे घेण्यात आले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे प्रमुख अतिथीमध्ये ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर,गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, ग्रीनफ्रेंड्स अध्यक्ष अशोक वैद्य, शिवलाल निखाडे,वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर व सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे हे होते.

            यावेळी लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ब्रँड अँबेसेडर व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी मार्गदर्शन करताना जागतिक चिमणी,वन,जल,हवामान दिन,पर्यावरणस्नेही होळी या सर्वांचा संदर्भ वापरीत भारतीय लोक साजरे करीत असलेले पारंपारिक सण व सणांचे झालेले आधुनिकीकरण यांमधील फरक समजावून देत सणांना पर्यावरणपुरक पध्दतीने साजरे करण्याची आवश्यकता जोडली त्याचबरोबर लाकडे वापरून केली जाणारी होळी तसेच रासायनिक रंगाने खेळली जाणारी होळी यावर प्रकाश टाकला. 

           सर्वच प्रमुख अतिथीनी व कार्यक्रमाध्यक्ष डॉ मनोज आगलावे यांनी विस्तृतपणे उपस्थित विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला नेफडो जिल्हा भंडारा व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबला सातत्याने सहकार्य करीत असलेले डॉ मनोज आगलावे व ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे यांचा ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे सन्मानचषक स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

         यानंतर लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने तसेच पर्यावरणस्नेही होळी निमित्ताने नेचर पार्कवर स्वच्छता अभियान राबवून जमा केलेला केरकचऱ्याचे प्रतिकात्मक पर्यावरणस्नेही होळी संदेशाकरिता वृक्षपूजनानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते ज्वलन करण्यात आले. यावेळी सर्वांनी करा रे होळी केरकचरा व व्यसनांची ,टाळा होळी लाकडाची व नैसर्गिक रंगाची असा उद्घोष अनेकदा केला.

           लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित नैसर्गिक कोरडे व ओले रंग बनवा तसेच चिमणी पक्षी ग्रीटिंग बनवा,होळी विषयी फलक लेखन स्पर्धा जागतिक चिमणी ,वन,जल,हवामान दिन निमित्ताने घेण्यात आली.या स्पर्धेत शर्वरी पडोळे,आरुषी नान्हे,नैना पाखमोडे, देवयानी नेवारे, सृष्टी वंजारी,वेदांती वंजारी,उन्नती देशमुख, पूर्वा देशमुख, चारू वैद्य,ईशान वैद्य,मंथन वैद्य,मयंक वंजारी,गायत्री वैद्य, सौम्या वैद्य,योगिनी मळकाम,खुशबू कुंभरे, रितिका कुंभरे, आराध्या आगलावे यांनी वरील सर्वच स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदवुन क्रमांक प्राप्त केला.त्याचबरोबर छोटे निसर्ग स्वयंसेवक शर्वरी आगलावे,जिनीसा आगलावे यांचे सुद्धा विशेष कौतुक करण्यात आले.

           यासर्वांना प्रमुख अतिथींच्या हस्ते मेडल व पारितोषिक वाटप करण्यात आले.सरीसृप संशोधक व सर्पमित्र विवेक बावनकुळे याने नवसर्पमित्र करण गायधने,तेजस कमाने,मयुर गायधने यांचे सहकार्याने 8 फूट लांबीचा भारतातील सर्वात विषारी साप पट्टेरी मण्यार दाखवून पर्यावरणस्नेही होळी निमित्ताने सापांविषयी जनजागृती केली.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाखनी नगरपंचायतीचे सिटी प्लॅनर व कोआरडीनेटर लीना कळमंबे, साकोली आगार प्रमुख सचिन आगरकर,लाखनी वाहतूक नियंत्रक श्यामकांत गिर्हेपुंजे,राणी लक्ष्मी विद्यालय मुख्याध्यापिका बारई मॅडम,हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर मॅडम, नगरपंचायत कर्मचारी पद्माकर गिर्हेपुंजे, सफाई कर्मचारी चंद्रकुमार बडोले, नानेश्वर मोहनकर,लोकेश भिवगडे,अनमोल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.