पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांची ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला भेट…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत शालेय अभ्यासक्रमासोबतच संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी ओळख ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रमाचे सुरु आहे.

           गेली दोन वर्षे आळंदीपुरता मर्यादित राहिलेला उपक्रमास आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांसह अनेक मराठी शाळांकडून प्रतिसाद येत असून, पंच्च्याहत्तर शाळा यंदाच्या वर्षी हा उपक्रम सुरू असल्याचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले.

           यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे आणि उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांचा ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव अजित वडगांवकर व सदस्य अनिल वडगांवकर यांनी सन्मान केला. यावेळीआयुक्त विनयकुमार चौबे यांनी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या प्रत्येक सुविधांचे कौतुक केले.