बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी परंपरेनुसार धार्मिक वातावरणात होलिका पूजन करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते होळीची आरती रविवारी (दि.24) करण्यात आली.
समाजात सत्प्रवृत्ती तसेच दुष्प्रवृत्तीही असतात. समाजातील या दुष्प्रवृत्तींचा नाश करून सत्प्रवृत्तीची वृद्धी व्हावी, तसेच होळीच्या पवित्र अग्निमध्ये अनीती, असत्य, भ्रष्टाचार,
अधर्माचे दहन तसेच निराशा, आळस, द्वेष, मत्सर, मतभेद यांचे दहन होऊन, सर्वांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभावे तसेच प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद, सुख आणि शांती तेवत राहावी, अशा शुभेच्छा हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांनी निमित्ताने व्यक्त केल्या.
तसेच भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन कालापासून होळी व धुलीवंदन सणास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने होळीच्या अग्निमध्ये विचारांची नकारात्मकता जळून जाऊन प्रेम, शांती, आनंद समाजामध्ये निर्माण व्हावा, तसेच जीवन सुंदर आणि रंगीबेरंगी असून, ही होळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अधिक प्रेम आणि आनंदाचे रंग निर्माण करेल, या शब्दात हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी जनतेला होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.