जेएसपीएम महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर कार्यशाळा आयोजित…

  भाविक करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

          श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. राजु किरमिरे सर तर प्रमुख मार्गदर्शक चेपटे सर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. लांजेवार सर हे मंचावर उपस्थित होते.

         यावेळी या कार्यक्रमात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी पुढील सत्र 2024 -25 या सत्रापासून लागू होत असून त्याचे स्वरूप कसे राहील. विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा करून घेता येईल विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समस्या याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

           या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक चेपटे सर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळीस विद्यार्थ्यांनी त्यांना येणाऱ्या समस्या याविषयी प्रा. चेपटे सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

        यावेळी प्रा. लांजेवार सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. किरमिरे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या त्या नक्कीच सोडवल्या जातील असे आश्वासन सुद्धा देण्यात आले.

         यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश चुधरी, प्रा. विणा जंबेवार मॅडम, प्रा. डॉ वाघ, प्रा. ज्ञानेश बनसोड सर, प्रा. डॉ. गोहणे सर, प्रा. डॉ. झाडे सर, प्रा. मानतेस तोंडरे सर, प्रा. डॉ. धवनकर सर, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डेवार भैसारे मॅडम, डॉ.प्रियंका पठाडे मॅडम, प्रा. टिकाराम धाकडे सर, प्रा. रणदिवे सर,राकेश बोनगिरवार, मनोज ननावरे, हरीश गोहणे, गणेश लांबट, भास्कर कायते तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या कार्यक्रमाचे संचालन प्रा. भाविकदास करमनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.संजय मांडवगडे सर यांनी केले.