शिवसेना (शिंदे गट) पक्ष्यात आरमोरी तालुक्यात बहुसंख्येने पक्षप्रवेश….    

ऋषी सहारे            

संपादक

             दिनांक २५/०१/२४ मौजा आरमोरी येथील विश्राम गृह या ठिकाणी हिंदू हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ना.एकनाथजी शिंदे यांचे आदेशानुसार  विदर्भ संगठन प्रमुख किरण पांडव, जिला संपर्क प्रमुख संदिप बरडे(पाटील), जिल्हा अध्यक्ष राकेश बेलसरे आणि महिला संपर्क प्रमुख सौ. वर्षा ताई मोरे यांचे मार्गदर्शनाखाली आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक नारायणजी धकाते, महिला जिल्हा प्रमुख (आरमोरीविधानसभा) अर्चनाताई संतोष गोंदोळे, विधानसभा क्षेत्र समनव‍यक राकेश बैस, विधासभा क्षेत्र प्रमुख संतोष गोंदोळे , आरमोरी तालुका अध्यक्ष मधुसूदन चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र दिवटे, शहर प्रमुख जयंत गोंदोळे आणि, महिला तालुका अध्यक्ष आरमोरी अल्काताई चंदणखेडे (मेश्राम), यांचे उपस्थितीत सौ शिल्पा ताई स्वप्नील ताडाम , रोहित गायकवाड , श्रीमती मीनाक्षी नैताम, अंकिता जोंजलकर, अजय यशवंत मोठ्घरे, सुरेश जिवतुरे, विशाखा ताडाम, आशा विलास लोणारे, संध्या शेकर कराडे , शीतल रामटेके यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

        या यशाचे श्रेय शिवसेना पदाधिकारी यांनी जिल्हा संपर्क प्रमुख संदिपजी बरडे (पाटील) यांना दिले आहे.  त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जिल्ह्याच्या आखरी टोकापर्यंत ग्रामीण भागात जाऊन अहोरात्र वेळ काढून भेटी देऊन पक्ष संघटन वाढविण्याचे कार्य केले व पक्षाची विचारसरणी पटऊन दिली त्यांच्या या प्रेरणेने कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश व गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार झाले. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शिवसैनिक कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे.